Ad will apear here
Next
पुण्यात सुरू आहे जागतिक गो-परिषद; देशी गोवंशांच्या प्रदर्शनाचेही आयोजन
पुणे : देशी गायींचे महत्त्व लक्षात येण्यासाठी आणि त्या संदर्भात जागृती करण्यासाठी पुण्यात बालेवाडी येथे कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंशाविषयीच्या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या परिषदेचे उद्धाटन राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांच्या हस्ते झाले. या परिषदेच्या निमित्ताने बालेवाडीतील मोझे महाविद्यालयाच्या मैदानावर देशी गोवंशांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील तीस जातींच्या गायी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्याविषयीची सविस्तर माहितीदेखील दिली जात आहे. हे प्रदर्शन एक डिसेंबर २०१९पर्यंत सुरू राहणार आहे.

गायीच्या शेणापासून दुधापर्यंतच्या प्रत्येक उत्पादनाचे महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने नागरिकांना माहिती दिली जात आहे. लहान मुलांकरिता विशेष पुस्तकेही या प्रदर्शनात आहेत. पशुखाद्याची माहिती देणारे स्टॉल्सही आहेत.

(त्या प्रदर्शनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZONCG
Similar Posts
टाकाऊ घटकांपासून बनवलेल्या कपड्यांचा अनोखा फॅशन शो पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ ही उक्ती सार्थ करत, पुण्यामध्ये चक्क कचरा या संकल्पनेवर आधारित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. मिस आणि मिसेस माय अर्थ नावाच्या या फॅशन शोमध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, इलेक्ट्रॉनिक वेस्ट (खराब झालेले की-बोर्ड, माउस, सीडी, डीव्हीडी) आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले ड्रेस सादर करण्यात आले
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
पुरंदरच्या तरुणांच्या ‘ऑस्करवाडी’ वेबसीरिजला जगभरातून उदंड प्रतिसाद पुणे : पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावातील तरुणांनी बनवलेल्या ग्रामीण भागातील जीवनावर आधारीत ‘ऑस्करवाडी’ या मराठी वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, त्यातील ‘शेतकऱ्यालासुद्धा इज्जत आहे’ या व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language